ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा-खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका.

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता

अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर करण्यात आले होते.पण अडीच किलोमीटर पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.आणी उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्त्यावर खड्डे व गिट्टी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन अखेरची घटका मोजत आहे.पाऊसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की वाहन दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा हा रस्ता गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला होता पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.

आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागला आहे.गेल्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून खड्डे तयार झाले आहे.

या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने ये -जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर