ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मारेगावात शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार; ३६ युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ३६ युवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यवतमाळ येथील आर्णी रोडवरील सम्राट हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात विविध गावांतील युवकांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला. यावेळी पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक विस्तारावर भर देण्यात आला.मयूर ठाकरे, अरुण आस्कर, किशोर मंदे, चेतन चामाटे, गोविंद माढरे, अनिल चिंचोलकर, प्रज्योत गाऊत्रे आणि रक्षित शेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमात आशिष कुळसंगे,जीवन काळे, संजय आवारी, किसन पाटील मत्ते, प्रशांत भंडारी, योगेश नागोसे, सतीश खोके, राजू ठेंगणे आणि धनराज भट्ट यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या वतीने विकासकामे, जनसंपर्क आणि संघटन बळकटीसंदर्भात भूमिका मांडण्यात आली.

तालुकाप्रमुख विशाल किन्हेकार यांनी मारेगाव तालुक्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले.पहापळ व मारेगाव परिसरातील युवकांच्या सहभागामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून त्याचे चित्र आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर