ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पत्रकारावर हल्याचा पुरोगामी पत्रकार संघातर्फे निषेध.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील ठाणेदारांना दिले निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

कळंब तालुक्यातील एका पत्रकारावर तेथीलच नगराध्यक्ष असलेल्या एका व्यक्तीच्या मुलाने जीवे मारण्याची धमकी देत थेट दुचाकीच त्यांच्या अंगावर चढवली.या घटनेचा निषेध म्हणून मारेगाव तालुका पत्रकार संघातर्फे मारेगाव येथील ठाणेदार यांना निवेदन देत निषेध नोंदवला.

पत्रकारिता देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.परंतु आता एखादी बातमी वृत्तपत्रातून प्रकाशित झाली आणि ती जर कोणाच्या विरोधात असेल तर अनेकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठते.असेच निर्भीडपने वृत्तांकन करणारे कळंब तालुक्यातील दैनिक देशोन्नती प्रतिनिधी शेषराव मोरे यांनी कळंब येथील एक वृत्त प्रकाशित केले.

यावरून तेथील नगराध्यक्ष असलेल्याच्या मुलाने या पत्रकाराच्या अंगावर थेट दुचाकी चढवत जीवे मारण्याची धमकी दिली. हे लोकशाहीला मारक असून या घटनेचा पुरोगामी पत्रकार संघ मारेगाव तर्फे मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांना निवेदन देत निषेध नोंदवला.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा प्रभारी भास्करराव धानफुले, कार्याध्यक्ष मोरेश्वर ठाकरे,तालुका अध्यक्ष सुमित हेपट,सचिव माणिक कांबळे,तालुका उपअध्यक्ष भास्कर राऊत, कोषाअध्यक्ष सुरेश पाचभाई,सुरेश नाखले,भैय्या कनाके, सुमित गेडाम,धनराज खंडरे,आनंद नक्षणे,गजानन आसूटकर, गजानन देवाळकर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर