ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

लक्ष वेधून घेताहेत हीरव्या शेतातील लाल गालिच्छ.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी केली मिरची पिकाची लागवड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव:सध्या मिरचीचे पीक निघाले लागले असून शेतात वाळत घातलेली लाल मिरची लक्ष वेधून घेत आहे.मारेगांव तालुक्यात कापुस व सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जायचे . परंतु गेल्या दोन तीन वर्ष कपासी वरील बोंडअळीच्या संकटाने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला लागली.त्यामुळं गेल्या दोन तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळला आहे.

यावर्षी जवळ जवळ दहा हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.बुरांडा,चिंचमंडळ,गोधनी पाथरी,मंगरूळ,हटवांजरी, खापरी,शिवारात मिरची लागवडचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.पिकली मिरचीचे तोडे सुरु आहे.वाळत घातलेली मिरची लक्ष वेधून घेतात.तोडणीसाठी मजुराचा तुडवडा जाणवत असून मजूरीचे दर वाढले आहेत.

चार पाच रुपये किलो प्रमाणे किंवा १८० ते २०० रुपये मोठ हारा ( डाल ) प्रमाणे मजुरी मोजावी लागत आहे.चार ते पाचशे रुपये एक मजूर दिवसला कमावत आहेत.वाळलेल्या मिरचीची विक्री शेतकरी करत आहे.

सध्या नागपूर कळमना मार्केट ला वाळलेल्या मालाला कमीत कमीत कमी १६ हजार रुपये तर जास्तीत जास्त २३ हजार प्रति क्विंटल दर मिळतो आहे.हा दर टिकून राहीला तर शेतकऱ्यांच लाल होण्याची स्वप्नं नक्कीचं साकार होईल अशी आशा आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर