ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन बळजबरी
अत्याचार.

62 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत आरोपीला अटक.

गजानन आसुटकर मारेगाव:- तालुक्यांतील एका गावातील शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी गजाआळ केले आहे.मारेगाव तालुक्यात ही घटना घडली असुन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले.रविवारी रात्री या जोडप्याला वणी तालुक्यातील मेंढोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

17 वर्षीय पीडिता हि मारेगांव तालुक्यातील एका गावात राहते.मुलगी शनिवारी दिनांक 11 मार्च 2023 रोज शनिवारला संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ती शौचास गेली होती.मात्र बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही.त्यामुळे त्यांनी मुलीला कॉल केला.

मात्र तिचा मोबाईल बंद होता.त्या मुळे पालकांनी आजूबाजुला शोधा शोध घेतला मात्र तिचा शोध लागला नाही.दरम्यान मुलीचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण असल्याची माहिती पालकांना मिळाली.त्यांने जबर दस्तीने मुलीला गाडीवर बसून नेल्याची त्यांना माहिती मिळाली.

रात्री उशिरापर्यंत मुलीचा पत्ता न लागल्याने मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठले.मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली.मारेगाव पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना मुलीचे संदीप परशराम धुर्वे वय सुमारे 28 वर्ष नामक एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याची माहिती मिळाली.

तांत्रिक मदत घेऊन मुलीचा शोध घेतला असता त्यांना सदर जोडपे हे वणी येथून बुरांडा (ख) येथे मुलाच्या नातेवाइकांच्या घरी एक रात्र थांबले व दुसऱ्या दिवशी वणी तालुक्यातील शिरपूर जवळील मेंढोली येथे असल्याची माहिती मिळाली.पोलीस पथकाने तात्काळ मेंढोली जात रविवारी रात्री या जोडप्याला ताब्यात घेतले.

मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.शनिवारी दिनांक 11 मार्च 2023 रोज शनिवारला संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मुलगी शौचास गेली होती.दरम्यान मुलीची वाट आरोपी संदीपने रोखली व तिला तुझ्याशी बोलचे असल्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले.

तिला घेऊन तो थेट वणी येथे घेवुन गेला.तिथून बुरांडा (ख) येथे एक रात्र थांबले त्या नंतर तो मेंढोली येथे मुलीला घेऊन गेला व त्याने मुलीवर अत्याचार केला,तसेच गावातही आरोपीने अनेकदा बलात्कार केला,अशी माहिती तिने पोलिसांना दिली.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप धुर्वे याच्यावर भादंविच्या कलम 363,कलम वाढ 376, 376(1)(A), 376(2) (N) सह कलम 4,6 पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण) कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली उप पो.नि.ज्ञानेश्वर सावंत व एन.पि.सि.शंकर बारेकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर