ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

25 डिसेंबर ला धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा

146 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊंडेशन
मारेगांव,जि.यवतमाळ द्वारा आयोजन,समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव: सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी तिरुपती मंगल कार्यालय,पेट्रोल पंपच्या बाजुला, वणी रोड, मार्डी, ता.मारेगांव जि यवतमाळ येथे सकाळी ११.०० वाजता धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा आयोजित केला आहे.

वणी, मारेगांव व झरी जामणी तालुक्यातील समस्त समाज बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे नवनियुक्त संचालक यांचा सत्कार सोहळा तथा समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

त्या निमीत्याने समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर विचारमंथन या प्रबोधन मेळाव्यात होणार आहे.तरी वणी, मारेगांव व झरी जामणी तालुक्यातील समाज बंधू भगिनींनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थितरहावे असे आवाहन मुख्य आयोजक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव, सह-आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मारेगाव,वणी,झरी तसेच वाघोबा-खंडोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट,वणी,महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी यांनी केले आहे.



मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मा.पांडुरंग खांदवे,प्रसिद्ध उद्योगपती तथाअध्यक्ष -राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशिय संस्था, यवतमाळ हे असून,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.दादाजी कालर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्डी हे उपस्थित राहणार आहे.मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.प्रा संजय बोधे,वरोरा लेखक,कवी, विचारवंत तथा कार्याध्यक्ष,धनगर अधिकारी कर्मचारी संघ, चंद्रपूर,मा.अविनाश जानकर विभागीय अध्यक्ष,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,अमरावती विभाग मा.कैलास उराडे,राजुरा, जिल्हाध्यक्ष,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,चंद्रपुर हे समाजाला मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून मा.साईनाथ बुच्चे,जेष्ठ कामगार नेते तथा
विभागीय अध्यक्ष,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, नागपूर,मा.आकाश शेंडगे,कार्यकारी अभियंता,बेंबळा प्रकल्प विभाग,यवतमाळ,मा.शंकरराव हटकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगांव,मा.प्रा.संजय लव्हाळे.अध्यक्ष,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊं.मारेगांव,मा.रमेश जारंडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, यवतमाळ,मा. डॉ. श्रीकांत भगत, जेष्ठ मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते, वणी,मा. विठ्ठलराव बुच्चे, जिल्हाध्यक्ष,
अधिकारी कर्मचारी आघाडी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,यवतमाळ,

मा. प्रा.रमेश बुच्चे, माजी प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मा. रामकृष्ण नवघरे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक,मा. डॉ. गजानन सोडनर,कला व वाणिज्य महाविद्यालय,मारेगांव,मा. विलास शेरकी, उपाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, यवतमाळ,मा.देविदासजी बोबडे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगांव,

मा. माणिकराव पांगुळ, उपाध्यक्ष, विविध कार्यकारी सहकार संस्था, मार्डी,मा. विठ्ठलराव काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मारेगांव, मा. अरविंद वखनोर, माजी उपसभापती, पंचायत समिती, मारेगांव,मा. रविराज चंदनखेडे, सरपंच, ग्रा.पं. मार्डी,मा. शेकन्ना भिंगेवार, मुख्याध्यापक, मुकूटबन,
मा. गजानन निरे, सामाजिक कार्यकर्ता, झरी जामणी उपस्थित राहणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर