ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

50 हजाराची लाचेची मागणी भोवली एक पोलिस व तीन महसुल कर्मचारी ACB च्या जाळ्यात अडकले.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रेती वाहतुक करणाऱ्याकडून लाच मागणे आले अंगलट.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

मुकुटबन येथील पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेला एक पोलीस व महसुल विभागाचे तीन कर्मचारी यांनी पाच महिण्याआधी रेतीचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रुपयाची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB)ने पडताळणी केली. व त्यांना पकडण्यासाठी वेळोवेळी सापळा रचला पण ते लाचखोर सापळत नव्हते अखेर आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

असुन संजय रामचंद्र खांडेकर वय 38 वर्ष, हे पोलीस नाईक म्हणुन पोलीस स्टेशन मुकूटबन येथे आहे.तर नमो सदाशिव शेंडे वय 38 वर्ष पद तलाठी साजा खातेरा,रमेश फकीरा राणे वय 48 वर्ष पद तलाठी साजा मुकूटबन,बाबुसींग किसन राठोड वय 53 वर्ष पद मंडळ अधिकारी असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकांची नावे असुन त्या चारही लोकसेवकांनी आपले कायदेशीर कर्तव्य न बजावता आर्थिक लाभ मिळण्याकरीता लाचेची मागणी केली.

ही घटना दिनांक 23/9/2022 ची असुन त्यांचे कडून वेळोवेळी पैश्याची मागणी केली.त्यांना तडजोडीअंती 50 हजार देण्याचे ठरले पण लाचखोर रंगेहाथ सापडत नव्हते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व बाबीची परताळणी केली व लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी अनेकवेळा सापळा रचला पण हे लाचखोर सापडत नव्हते अखेर आज ACB ने केलेल्या परताळणी व लाचेची मागणी केल्याचे त्यांनी मान्य केले.त्यामुळे खात्री पटल्यानंतर या चौघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू आहे.

सदरची कार्यवाही मारूती जगताप पोलीस अधीक्षकअॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्रअमरावती,अरूण सावंत अपर पोलीस अधीक्षक अमरावती,देविदास घेवारे अपर पोलीस अधीक्षक अमरावती आणि पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट आणि अंमलदार अब्दुल वसिम, सचिन भोयर, महेश वाकोडे, सुधीर कांबळे,राकेश सावसाकडे व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे यांनी केली.

नागरीकांना आवाहन.

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे खालील नंबरवर संपर्क साधावा.दुरध्वनी क्रं – 07232-244002 टोल फ्रि क्रं 1064

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर