ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा (ख) ग्रा.प.चा अजब कारभार

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वार्ड 3 चा रस्ता चिखलात,पायदळ चालने कठीण

वार्डातील महिला व पुरुषाकडून रोष व्यक्त,सिमेंट रोड करण्याची मागणी

आरोग्य विभागाच्या पी.एच.सी.ला जाण्यासाठी रस्ताच नाही

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख)ग्राम पंचायत वार्ड क्र.3 मधील जवळपास 400 मीटरचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला. याच वार्डात आरोग्य विभागाच्या नवीन पी.एच. सी. चे बांधकाम करण्यात आले आहे.पण या दवाखान्यापर्यंत जायला रस्ता मात्र ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला नाही.दरवर्षी या वार्डातील रहिवाशांना चिखलाचा हा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु अनेकदा गावकऱ्यांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत कडून दखल घेतली गेली नाही ही शोकांकित आहे.

बुरांडा (ख) येथील वार्ड क्र.3 मधील पहिली गल्ली महेंद्र कवाडे यांचे घरापासून ते बुरांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत जवळपास 200 मीटरचा आणि दुसऱ्या गल्लीमध्ये मडावी यांच्या घराजवळून तर नविन प्राथमिक आरोग्य केंद्र बुरांडा पर्यंत जवळपास 200 मीटरच्या संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

बुरांडा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 3 ही नवीन वस्ती निर्माण झाल्याला अंदाजे 12 ते 15 वर्ष झाले.पण अजून पर्यंत या वार्डात साधा रस्ता सुद्धा ग्रामपंचायत कडून तयार करण्यात आला नाही किंवा मुरूम टाकून पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही.त्यामुळे तेथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.


तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात घरासमोर साचलेल्या पाण्यातून आणि एक ते दीड फूट चिखलातून प्रवास करावा लागत आहे.एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला रस्त्यापर्यंत उचलून आणावे लागत आहे.साधी मोटर सायकल सुद्धा वार्ड नंबर 3 मध्ये जात नाही ही शोकांकित आहे.

आता पावसाळा सुरू असल्याने अतिशय चिखल झाले असून रहिवाशांना आपल्या घरापर्यंत ये-जा करणे कठीण झाले आहे.दुचाकी व इतर वाहन घरां पर्यंत नेता येत नाही.वयोवृद्ध व शाळकरी मुलांना यांचा अतिशय त्रास होत असून शेतकऱ्यांना रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत कसे न्यावे हा प्रश्न पडला आहे.


गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवासी हा त्रास सहन करत असून येथील रहिवाशांना पावसाळा नकोसा होऊन जातो आहे.
चुकीच्या ग्रामपंचायतच्या नियोजनाने येथील नागरिकांना पावसाळ्यात डेंगू,मलेरिया यासारखा आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

या गलत कारभारामुळे विशेषतः महीलां व पुरुषाकडून रोष व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर उपयोजना करण्याची मागणी सहील/दीपक आनंद ताकसांडे,अमोल अशोक सातपुते,पुष्पा कार्तिक उईके,ऋषी मुंकीदा मोहीतकार,सुनिता विठ्ठल सुर्तेकर,मंदा दिलीप गाडगे,जया सुधाकर सूर्तेकर,अमृता मधुकर सूर्तेकर,सारीका शंकर सोनटक्के, दादाराव महादेव आत्राम,तानेबाई रामभाऊ मेश्राम,

रामभाऊ चिन्नू मेश्राम,देविदास कवडू आत्राम,सुगंधा देविदास आत्राम ,सिमा अशोक मडावी,शुभांगी महादेव मेसेकार,रामदास शामराव मेसेकार, मंगला रामकिसन ढेगळे,अनिकेत रामकिसन ढेगळे, योगेश मोहन गुंजेकार,मोहन बापुराव गुंजेकार,अशोक भगवान सातपुते,गिरजा महादेव सोयाम,नवनीत महादेव सोयाम,अंकिता रुपेश दुधकोवडे,देवानंद कडू ताकसांडे, मयूर देवानंद ताकसांडे दामू राऊत,

गौराबाई नेहारे,कार्तिक उईके,अवी गाडगे, महेंद्र कवाडे,शेषराज कांबळे नारायण शेंडे,विजय सिडाम,सुधाकर सूर्तेकार, सोमेश्वर मडावी, अलका मडावी,करण शेंडे, गजानन वामन गुलगुंडे, गीता गजानन गुलगुंडे रहिवाशांनी केली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर