ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

30 वर्षीय नराधमाने केला 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर  बलात्कार.

61 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पहापळ येथील घटना..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार  बलात्कार व विनयभंगाच्या घटनेने पुन्हा हादरला मारेगाव तालुका दोन प्रकरण ताजे असतानाच आज आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेतून  मारेगाव तालुका सावरले नसतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील पहापळ येथे घडला.एका सुमारे 30 वर्षीय विवाहित इसमाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण केले आणि तीच्यावर बलात्कार  केला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींला जेरबंद केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कडून प्राप्त माहितीनूसार, पिडीत मुलीचे कुटूंब पहापळ येथे राहते. दिनांक 9 मे रोजी पिडीता तिच्या आजीसोबत सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास शौचास गावाबाहेर गेली असता त्यावेळेस नराधम पिडित मुलीला उचलून पहापळ शेतशिवारात नेली. तेथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, काही वेळाने घरच्यांना मुलगी दिसत नसल्याने प्रथम त्यांनी परिसरात आजूबाजूला मुलीचा शोध घेतला. मात्र रात्र जागुन मुलीचा पत्ता लागला नाही 10 मे 2022 रोजी सकाळी एका शेतातील काट्यांच्या फासात मुलगी आढळून आली असुन घराच्या सदस्यांनी मुलीला घरी नेवून विश्वासात घेवून विचारना केली असता पिडित मुलीने घराच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती देतात घरच्या सदस्यांची तळपायाची आग मस्तकात गेली व त्यांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. संशयीत आरोपी मारोती मधुकर भेंडाळे वय सुमारे 30 वर्ष रा.पहापळ ता.मारेगाव या संशयीत आरोपीला पोलिसांनीही मोठ्या शिताफीने वडकी येथून अटक केली असुन त्याच्यावर कलम 307,366 ,376 (AB) पोक्सो भादवि व सहकलम (लैंगीक गुन्ह्यापासून 4,6,8 बाल संरक्षण कायदा  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे) याघटनेचा पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस पुढील तपास करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर