ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ट्रकला दुचाकीची मागून धडक, दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपासमोरील घटना

सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

मारेगाव येथून नवरगाव येथे आपल्या चुलत भावाच्या मयतीसाठी दुचाकीने जात असताना करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली.यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला.ही घटना आज दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी गुरुवारला सायंकाळी ८:३० वाजताचे दरम्यान घडली.

यशवंत नामदेव डवरे वय अंदाजे ४८ वर्ष रा.ता.मारेगाव असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.मारेगाव येथील यशवंत हे आज रात्री नवरगाव येथे चुलत भावाच्या मयतीसाठी जात असताना करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपा समोरील पुलाजवळ ट्रकला मागुन जोरदार धडक दिली.

या अपघातात यशवंत हे गंभीर जखमी झाले असून त्याचा अपघात घडताच रस्त्याने येजा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचार साठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.सदर घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर