ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अखेर त्या अपघातातील व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नागपुर येथील दवाखान्यात होते उपचार सुरू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- गजानन आसुटकर.

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर मारेगाव जवळील इंडियन पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 10 एप्रिल 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. सुमारे चार दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर अखेर आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोज शनिवारला नागपुर येथील एका रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बाबाराव रघुनाथ सुर रा.वणी वय सुमारे 49 वर्ष असे त्या अपघातातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते आधी कोलगांव ता.मारेगांव जि.यवतमाळ येथील रहिवासी होते.सध्या ते वणी येथील रहिवासी होते.दिनांक 10 एप्रिल 2023 रोज सोमवारला ते दुचाकीने काही कामानिमित्त मारेगांव येथे आले होते.मारेगांव येथील काम आटोपून आपल्या गावाकडे वणी येथे जात असताना मारेगांव ते वणी राज्य महामार्गावर इंडियन पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाने बाबाराव सूर यांना जबर धडक दिली व पसार झाला.

अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.व त्यांना लगेच मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले होते.सूर यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असतांना आज त्यांची प्राणज्योत मालवली.बाबाराव यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर