ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वणव्याने जंगलं जळूनराख.

52 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वन्य प्राण्यांची लोक वस्तीकडे धाव.

कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:-तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जंगल लाभले आहे.ही वन संपदा तालुक्यासाठी वरदान आहे.या संपदेच्या संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी असंख्य कर्मचारी आहे.

परंतु ही वनसंपत्तीवर काहीचा डोळा असून ती ओरबळण्याचे काम सुरू आहे.या उन्ह्यळ्यात शेकडो हेक्टर क्षेत्र आगीने होरपळून निघालेली पाहायला मिळत असून याकडे वण कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
मुकुटबन वनपरिक्षेत्रात ७ हजार आठशे हेक्टर झरी वन परिक्षेत्रात १० हजार चारशे चाळीस हेक्टर नैसर्गिक जंगल आहे.

या जंगलात साग ह्या मौल्यवान वृक्षा सोबत इतरही दुर्मिळ वनस्पती या ठिकाणी आहे.या जंगलात वाघाचचा अधिवास आहे.गेल्या पंदरवाड्यात अनेक जंगलबिट ला वणवा लागून शेकडो हेक्टर क्षेत्राची राख होऊन पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचे दिसून येते.आगीमुळे जैव विविधतेला धोका
निर्माण झाला आहे.

वन विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या दाभाडी, झमकोला वन क्षेत्रात दिसून येते वणव्यामुळे चारा नष्ट झाल्याने रोही,हरिण,ससा या सारखे प्राणी मानव बस्तीकडे धाव घेत असून त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आगीच्या घटना मुळे वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.पालापाचोळा जळल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता आहे.

लागेल्या वणव्यामुळे बांबूच्या झाडाचा फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली दिसून येते.आगीने सरपटणारे प्राणी होरपडून मृत झाले आहे.दरवर्षी लागत अलेल्या आगीने पशु पक्षाच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.आगीच्या घटनांमुळे वन आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असताना वन पर्यावरण वन्यजिव यांचे संरक्षण, संवर्धन करण्यास वनविभाग व वन विकास महामंडळ कमी पडत असल्याची खंत निसर्ग व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत असून याकडे वरिष्ठ अधिकान्यांनी लक्ष घालून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

कृत्रीम पाणवठ्याकडे दुर्लक्ष.
काही नैसर्गिक पाणवठे उन्हाळ्यात आटून जातात प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येवून त्याची शिकार होण्याची शक्यता असते त्यामुळे या काळात वन्य प्राण्याना जंगलात पाणी मिळावे या करिता शासनाने करोड़ो रुपये खर्च करुन कृत्रीम पाणवठे तयार केले आहे,परंतु त्यातील काही पाणवठे बंद आहे. मुकुटबन क्षेत्रात ६ नैसर्गीक आणि ८ कृत्रीम पाणवठे आहे. त्यात ५ पाणवठे सुरु आहे. झरी वनपरिक्षेत्रातील ५ पैकी २ पाणवठे बंद असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर