ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील कुंभा,चिंचाळा व मंगरूळ परिसरात जाणवले धक्के

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात काल रात्रीची वेळ होती, 10.30 ते 11च्या दरम्यान ची वेळ. सर्वजण आपापल्या घरी शांततेने झोपलेले होते. अशातच एकाएकी जोराचा धक्का जाणवला. अनेकांना काय झाले कळलेच नाही आणि भीतीने आपल्या घराच्या बाहेर निघाले. ज्यांचे टीन आणि कौलांचे घर होते, त्यांच्या टीनांचा आवाज आला. काहींच्या घरी भांडे पडल्याचा आवाज झाला.

नागरिकांना वाटले कदाचित ब्लास्टिंगचा वगैरे आवाज असेल.परंतु नंतर कळले की हा भूकंपाचा सौम्य धक्का होता.त्यामुळे नागरिक भीतीने घराच्या बाहेर  पडले.काहींनी तर अख्खी रात्र जागून काढल्याची चर्चा तालुक्यातील  पीसगाव, कुंभा, सिंधी मांगरूळ,चिंचाळा या गावांमध्ये घडली.

मारेगाव तालुक्याला लागून भांडेवाडा ही भूमिगत खान आहे. तिथे अनेकदा कोळसा काढण्याचे वेळी ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगचा आवाज आणि धक्का लोकांना परिचयाचा आहे. परंतु दिनांक 14 फेब्रुवारी 2025 च्या रात्री अंदाजे 10.30  च्या सुमारास रात्री सगळे लोक रात्रीच्या वेळेस आपल्या घरी शांतपणे झोपलेले असताना अचानक जोराचा आवाज आला.



यात ज्यांचे घर टीनेचे होते त्यांच्या टीनांचा आवाज आला. तर काही लोकांच्या घरची भांडी सुद्धा पडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावरून हा धक्का भूकंपाचा की कशाचा याची अजूनही पुष्टी केलेली नसली तरी नागरिकांच्या मनामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

सुरुवातीला हा धक्का ब्लास्टिंगचा असावा अशीही अनेकांना शंका आली. त्यामुळे नागरिकांनी जवळपास ब्लास्टिंगचे काम कोठे सुरू आहेत का याची चौकशी केली. परंतु त्यांना कोठेही ब्लास्टिंग सुरू असल्याचे आढळून आले नाही. याविषयी विदर्भ एस. पी. न्यूज नेटवर्कने मारेगाव तहसीलचे  तहसीलदार श्री. उत्तम निलावाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही अशा प्रकारचे मला कॉल आले.आणि मी पीसगाव, सिंधी,कुंभा या गावांना भेटी देऊन चौकशी केली. तसेच याविषयी वरिष्ठ कार्यालयाला माहिती सुद्धा दिली असल्याचे सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर