ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

प्रमोद जिड्डेवार सहा.फौजदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

मारेगाव येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार प्रमोद केदाररावजी जिड्डेवार यांना त्यांच्या सेवा काळातील केलेल्या सेवेची व कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह दिनांक 1 मे 2023 रोज सोमवारला प्रदान करण्यात येणार असुन आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोज गुरुवारला मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी तथा कर्मचाऱ्यांकडून जिड्डेवार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सहाय्यक फौजदार प्रमोद जिड्डेवार यांचा जन्म दिनांक 3/8/1969 रा.वालदुर ता.राळेगाव जि.यवतमाळ येथे झाला ते 1989 मध्ये पोलीस दलात भरती झाले.सन 1989 ला त्यांची प्रथम नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात झाली.सन 1992 ला C 60 नक्षलवादविरोधी अभियान पथक मध्ये काम केले व त्यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात झाली.

सन 1992 मध्ये विनंती अर्जा वरुण करण्यात आली 1989 ते 2023 या 34 वर्षात जिड्डेवार यांना आजपर्यंत 181 रिवार्ड मिळाले असुन आतापर्यंतच्या सेवा काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत जिड्डेवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन त्यांना 1 मे 2023 रोज सोमवारला सन्मानित करण्यात येणार आहे.

आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी व कर्मचाऱ्यांकडून सहाय्यक फौजदार प्रमोद जिड्डेवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळणार असल्याने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मारेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांचे सह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत,सहा फौ.रमेश ताजने,आनंद अलवार, पो.ना.अजय वाभिटकर,रजनिकांत पाटील,जुनैद शेख,राजेंद्र चांदेकर,राजु टेकाम,एल.एस.सी.संगीता दोरेवार,एल पी सी पायल दुधकोहळे,प्रिया निंब्रड,पी.सी विनेश राठोड, एन.पी.सी.शंकर बारेकर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर