ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…
SP News Maregaon

31 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

1.6k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव (धरण) येथील घटना

सततच्या आत्महत्येने समाजमन सुन्न

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथे घरी कोणीच नसल्याचे पाहून एका युवकाने आपल्या राहत्या जुन्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 31 मे 2025 रोज शनिवारला सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शुभम तुळशीराम करलुके वय 31 वर्षे रा.नवरगाव (धरण) ता.मारेगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

शुभमच्या आईच्या नावे घरकुल आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले घर बांधकामासाठी खोलले असून ते बाजूच्या घरी किरायाने राहत होते.आई काही कामानिमित्त बाहेर गावला गेलेली होती. शुभम आणि त्याचा भाऊ हे दोघे घरी होते.आई नसल्याने शुभमचा भाऊ हा नळावर पाणी भरण्यासाठी गेला होता.

अशातच शुभमने आपल्या खोललेल्या जुन्या घरी डिशच्या केबलने आत्महत्या केली.सदर घटना सकाळी 11.45 वाजता उघडकीस आली.
शुभम हा अविवाहित होता.तो तलावमध्ये मासळी पकडण्याचे काम करायचा.

शुभमने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट नाही. शुभमचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.शुभमच्या पश्चात आई,वडील,भाऊ,विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. शुभमच्या आत्महत्येचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे  मार्गदर्शनात दिगंबर किनाके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर