ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नवरगाव यात्रेमध्ये शंकरपटाची धूम

157 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते उदघाटन

शंकरपट बघण्यासाठी उसळणार अलोट गर्दी

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

महाशिवरात्रीच्या पर्वावर नवरगाव येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.या शंकरपटाला आज पासून सुरुवात होणार असून कुंभा येथील सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांचे हस्ते या शंकरपटाचे उदघाटन होणार आहे.मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथे प्रेक्षकांची अलोट गर्दी उसळणार आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथे श्री कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात घटस्थापना करण्यात येते.काल दिनांक 14 मार्च 2024 रोज गुरुवारला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोपालकाला संपन्न झाला व यात्रेला सुरुवात झाली.मागील वर्षी पासून या ठिकाणी भव्य शंकरपटाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात येत आहे.

हा शंकरपट बघण्यासाठी अलोट जनसागर उपस्थित असणार आहे.श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए-३९२ द्वारा १४ ते १८ मार्च पर्यंत येथे भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले आहे.या शंकरपटाला तालुक्यासह बाहेर जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान कमिटी आणि सरपंच अरविंदभाऊ ठाकरे मित्र परिवाराची यात मोलाची कामगिरी व अथक परिश्रम असते. तसेच आज दिनांक १५ रोज शुक्रवार पासून सुरू होणारा हा भव्य शंकरपट दिनांक १७ मार्च रोज रविवार पर्यंत हा शंकरपट असणार आहे.यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कमेटीतर्फे करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर