ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

चार वर्षे झाली पण वन विभागाच्या त्या इमारती रिकाम्या

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी असणारे
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी    राहण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभाकडून तालुक्यात शासकिय सुसज्य निवासस्थाने निर्माण करण्यात आली आहे .  लोक प्रतिनिधी च्या अनास्थेमुळे
लाखो रुपये खर्चून बांधलेल्या त्या इमारती धुळकात पडल्या आहेत . काही निवास्थाने दुर्लक्ष पणा मुळे खचल्या असून बऱ्याच इमारतीत आतिक्रम  करण्यात आले असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे .

      अशाच प्रकारे  झरी तालुक्यात पाटण झरी रोडवर घोन्सा फाट्यावर  वनविभागाने  कार्यालय निवासस्थान  बांधकाम पूर्ण होवून  तीन चार वर्षे  झाली आहेत. परतु  इतके दिवस होऊनही या इमारतीचा उपयोग कोणीच करताना दिसत नसल्याने या इमारती  कशाला ? कुणासाठी   ?  बांधल्या  असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला  पडला आहे.
       तालुक्‍यात मौल्यवान अशी वनसंपदा आहे.  त्याचे  रक्षण  करण्यासाठी शासन च्या वनविभागाने  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे .
पवनार , शेकापूर , जुनोनी , जामणी शिबला  इ. ठीकणी राहण्याची व्यवस्था असून त्या ठिकाणी वन कर्मचारी राहत असतात
   परंतु ते मुख्यालयी न राहता वणी पांढरकवडा , यवतमाळ या शहरांतून अपडाऊन करत असून याला  वरिष्ठांचे  छुपे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र याचा फायदा शिकारी व लाकूड चोरट्यांना होत आहे . मोर , सारज या दुर्मिळ वन्य प्राण्यांची शिकार केली जात आहे . मौल्यवान साग व दुर्मिळ वनपस्ती चोरट्याकडू ओरबडली जात असतांना वनविभागाकडून आजवरी कोणावरही कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. एकीकडे   वनसंपत्ती आणि  वन्यजीव यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
       झरीत   गेल्या तिन चार वर्षापासून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर  केवळ विद्यूत पुरवठा सुरु न झाल्याचे कारण सांगून त्या इमारती ओसपडल्या आहे . याकडे  वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांचे दुर्लक्ष करीत असल्याचे  दिसून येत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर