ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

बोटोनी येथील महिलांनी पकडली अवैध देशी दारू.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अवैध दारु विक्री विरोधात बोटोणी येथील महिलांनी दिले ठाणेदार यांना निवेदन.

काही वेळातच महिलांनी पकडी अवैध देशी दारु.

गजानन आसुटकर मारेगाव.

बोटोणी येथे अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला होता.दारुमुळे अनेकचे संसार उध्वस्त होताना दिसुन येत होते.तरीही या दारूच्या आहारी परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात गेले होते.घरी वाढलेले भांडण तंटे पाहून अखेर महिलांनी आज दिनांक 25 मे 2023 रोज गुरुवारला अवैध दारू विक्री विरोधात ठाणेदार,पोलीस स्टेशन मारेगाव यांना निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तालुक्यात बोटोणी परिसर हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो.परिसरात अवैध दारू विक्री जोमाने सुरू असून अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण दूषित होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी बोटोणी येथील महिलांनी मारेगाव येथील ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.

बोटोणी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकुळ माजविला असून येथील काही नागरिकांची अवैध दारू विक्री करीत असल्याची रीतसर तक्रार निवेदनातुन करण्यात आली आहे.आज दिनांक 25 मे 2023 रोज गुरुवारला तालुक्यातील बोटोणी येथील महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्री विरोधात ठाणेदार यांना निवेदन देत त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी माजी प.स.सदस्या सुनीता शंकर लालसरे,सुनीता विनायक जुमनाके सरपंच,सविता सतीश मत्ते,वैशाली गानफाडे,वेनुबाई तुरांनकर,किरण तुरानकर,सरीता मत्ते,वनिता हनुमान सिडाम,सुरेखा मिंदेवार,रंजना दोडेवार,लीलाबाई किनाके,लक्ष्मीबाई झिंगरे यांचे सह बोटोणी येथील अनेक महिला उपस्थित होत्या.

परत येताच महिलांनी पकडली दारू.

बोटोणी येथील महिला निवेदन देऊन परत येताच त्यांना गावामध्ये दारू विक्री सुरु असल्याचे कळताच त्या सरळ सुरेश पायलवार याच्या घरी धडकल्या असता त्यांना पायलवार याचे घरी देशी दारूचे पव्वे आढळून आले.महिलांनी हे पव्वे पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले.परीसरात बोटोणी येथील महिला कौतुकास पात्र ठरत आहे.

प्रतिक्रिया..
या आधी पण अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.बोटोणी येथील निवेदन प्राप्त होताच लगेच पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. ठाणेदार राजेश पुरी पोलीस स्टेशन मारेगाव.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर