ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दहावीच्या परीक्षेचा झरी जामणी तालुक्याचा ८९.६३ % निकाल.

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सात शाळांचा निकाल शंभर टक्के.

संकेत माध्यमिक विद्यालय वाढोना बंदी चा निकाल सर्वात कमी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी राज्य शिक्षण मंडळाचा दहावी बोर्डाच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे.परिक्षेसाठी ८७७ विद्यार्थ्यांनी  परिक्षा फार्म भरला होता त्यापैकी ८५८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी ७६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

गुणवत्ता यादीत १३५ ,प्रथम श्रेणी ३०५, व्दितिय श्रेणी २६३ आणि तृतिय श्रेणीत ६६ उत्तीर्ण झाले आहे.राजिव माध्यमिक विद्यालय धानोरा ३२ पैकी ३२ विद्यार्थी पास झाले,तर जिल्हा परिषद विद्यालय पाटण ३/३ ,राजाराम विद्यालय आहेरअल्ली ४१/४१ ,शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा मार्थाजून  १८/१८,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा झरी जामणी ७/७, आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकुटबन २१/२१,गुरुकूल कॉन्व्हेन्ट मुकूटबन ३६/३६ या सर्व च्या सर्वशाळेचे विद्यार्थी उर्तीण  झाल्याने निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे.

तर सर्वात कमी निकाल संकेत माध्यमिक विद्यालय वाढोणा (बंदी ) या शाळेचा निकाल ७०% असून तालुक्यातील इतर शाळांच्या  तुलनेत सर्वात कमी आहे .गुरुकुल कॉन्व्हेन्ट मुकूटबन चे  २६ तर आर्या इंटरनॅशनल स्कूल मुकूटबन २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकली आहे .सर्वात   जास्त  गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.

गेल्या दोन-तीन सत्रात कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले.त्यामुळे सर्वच शाळांची निकालाची शंभर टक्के टक्केवारी दिसून आली.त्याचा विचार करतो यावर्षीच्या मार्काला लागली खूप काही महत्व आहे.पहिल्याच पेपरच्या दिवशी तालुक्यातील पेपर फुटीचे प्रकरण चांगलेच राज्यभर गाजले होते.त्यामुळे सर्वच केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवून कापी मुक्त परीक्षा घेण्यात आली होती .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर