ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

एकोना खदानीच्या उच्च दाबाच्या ब्लास्टींग त्वरीत बंद करा.

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन.

कानडा, शिवणी, मुक्टा, वनोजा परिसराला बसतात हादरे.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील एकोना खदाणीला लागून असलेल्या वर्धा नदी काठाजवळील अनेक गावांना एकोना खदानीमध्ये होत असलेल्या उच्च दाबाच्या ब्लास्टिंगमुळे हादरे बसत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या उच्च दाबाच्या ब्लास्टिंग त्वरीत बंद करण्यात याव्या अशा प्रकारचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.

तालुक्यातील कानडा, मुक्टा,शिवणी (धोबे), चनोडा, चोपन,दांडगांव,आपटी,गोरज,हिवरा, वनोजादेवी या गावांना ब्लास्टींगमुळे कंपन (हादरे) बसत आहे. वरोरा तालुक्यातील एकोना खदाणीद्वारे होत असलेल्या उच्च दाबाच्या ब्लास्टींगमुळे मार्डी सर्कल मधील 10 गावांना दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास कंपन (हादरे) नेहमी बसत आहे.

एकोना ओपन कोलमाईन्स वरोरा द्वारे होत असलेल्या उच्च दाबाच्या ब्लास्टींगमुळे मार्डी परिसरातील 10 गावातील मकानांना तळा (भेगा) जाण्यास सुरुवात झाली आहे. त्या मुळे मकानाचे आयुष्य कमी होत आहे. या ब्लास्टींगच्या कंपनामुळे अनेक वयोवृद्ध लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.तर लहान मुलांना झोपेतुन अचानक दचकून उठावे लागत आहे.

त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होत आहे.तरी एकोना ओपन कोलमाईन्स (वरोरा) या मुळे होत असलेल्या उच्च दाबाचे कंपन त्वरीत बंद करण्यात यावे,जेणेकरुन अनेक गावातील मकानाची वयोमर्यादा कमी होणार नाही व वयोवृद्ध व लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही.

असे निवेदन आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे सह तहसीलदार मारेगांव यांना देण्यात आले आहे.या वेळी ज्ञानेश्वर चिकटे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मारेगाव,प्रसाद सुधाकरराव ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव,विजय खिरटकर,प्रसाद झाडे,गणपत वऱ्हाटे,गणेश झाडे (भाजयुमो),हुकेश नांदे,धनराज ढवस,सुनिल झिले,अभिजीत ढवस,मारोती कोंढेकर,प्रशांत भंडारी,राजु मिलमिले,मारोती तुरणकर.यांचे सह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर