ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टाकळी(कुंभा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  पुर्व तयारी मेळावा कार्यक्रम संपन्न

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगावःदिनांक 19 एप्रिल 2022रोज मंगळवारला तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा पुर्व तयारी “” विद्यार्थी व बाल मेळावा 2022 “” कार्यक्रम साजरा करण्यात आला.

वर्ग पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची सकाळी गावात घोषवाक्ये देत जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. सकाळी 9:-30 ला शाळा पूर्व मेळाव्याचे दिनेशजी डाखरे( अध्यक्ष शा. व्य. समिती)क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून व सौ.प्रेमिलाताई आदेवार(सरपंच ग्रा.पं. टाकळी) यांनी फीत कापून उदघाटन केले. या प्रसंगी देवेंद्रजी डाहूले (उपाध्यक्ष शा. व्य. समिती), विलासजी बरडे, अरविंद डाहूले, सौ.संगीताताई आदेवार(पो.पाटील), घनश्यामजी खेवले, सौ.चंद्रकलाताई राऊत, मुन मॅडम(सचिव ग्रा.प. टाकळी), अंगणवाडी ताई, विद्यार्थी, स्वयंसेवक उपस्थित होते.

माता-पालक आपल्या पाल्याना घेऊन शाळेत आले. शाळेसमोर दाखलपात्र विधार्थ्याना गुच्छ व पालकांना हार घालून स्वागत करण्यात आले. ग्रा.पं. टाकळी तर्फे बुक-पेन वाटप करण्यात आले. सेल्फी पॉईन्ट वर फोटो घेण्यात आला. त्यानंतर त्यांची नोंदणी व वजन उंची घेण्यात आली. कायमस्वरूपी आठवण म्हणून हाताचे ठसे घेण्यात आले. भाषा विकास,समाजीक व भावनात्मक विकास ,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,गणनपूर्व तयारी असे प्रत्येक स्टॉल ला विध्यार्थी भेट व चाचणी करण्यात आली.
अश्या प्रकारे शाळा पूर्व तयारी मेळावा-1 उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजू कुटे (मुख्याध्यापक,टाकळी), सौरभ शेबलकार, महेश काकडे, प्रणाल मडावी, हर्षल वादाफळे, बंडुजी कुडमेथे, समस्त शा. व्य.समिती,ग्रा.पं. टाकळी ,व पालक,ग्रामवाशी यांनी प्रयत्न केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर