ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

घोडदरा येथील व्यक्तीचा नागपूर-हैदराबाद महामार्गावर पिंपरी येथे अपघात.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अपघातात रवी भाऊराव राऊत ठार.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील रवी भाऊराव राऊत हे काल दिनांक 18 जुन 2023 रोज रविवारला घोडदरा येथुन 4 वाजताच्या सुमारास दोन्ही मुलीची तब्येत दाखविण्याकरीता मुली सह सेवाग्राम येथे निघालेल्या होते पण रस्त्यातच वडीलांचे अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद राज्य महामार्गावरील पिंपरी (पोहना) येथे घडली. या घटनेने गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रवी भाऊराव राऊत वय सुमारे 40 वर्ष रा.घोडदरा असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून आचल व अक्षरा अशी अपघातात किरकोळ जखमी असलेल्या त्यांच्या मुलींची नावे आहे.मुलीची तब्येत ठिक नसल्याने काल ते मुलीनं सह घोडदरा येथुन निघाले होते रात्री ते नातेवाईकांकडे मुक्काम करून आज 19 जुनला सकाळी मुलीला सेवाग्राम येथे रुग्णालयात दाखवायला जाणार होते.

पण त्यांच्या वेळे आधीच अपघात झाला यात रवी हे ठार झाले.काल ते घोडदरा येथुन दुचाकीने आपल्या दोन्ही मुलींसह नातेवाईकांकडे जात असताना नागपूर- हैदराबाद महामार्गावरील पिंपरी (पोहना) जवळ रस्त्यावरील खड्डा निदर्शनास न आल्याने खड्ड्यातून त्यांची दुचाकी उसळली.व ते रस्त्यावर कोसळले त्या मुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते घटनास्थळीच ठार झाले.

तर त्यांच्या दोन्ही मुली किरकोळ जखमी झाल्या.हा अपघात होताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना प्रथम उपचारासाठी वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.असुन आचल व अक्षरा त्यांच्या या दोन्ही मुलींची प्रकृती बरी असल्याची माहिती आहे.

मृत रवी यांचे पश्चात आई,वडील,पत्नी व चार मुली असा आप्त परिवार आहे. त्याचे असे अवेळी जग सोडून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर