ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

लाडक्या ओवीचा दुसरा वाढदिवस उत्साहात साजरा

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

माडेकर कुटुंबात आनंदाची उधळण

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील माडेकर कुटुंबात आज आनंदाचा आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कु. श्रीजा उर्फ ओवी जगदीश माडेकर हिचा दुसरा वाढदिवस आज मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या या चिमुकलीने आपल्या निरागस हास्याने आणि गोंडस खोडकर लीलांनी संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले आहे. तिच्या आगमनानंतर घरात आनंद, चैतन्य आणि प्रेमाची सतत उधळण होत असून, तिच्या वाढदिवसानिमित्त आज कुटुंबीयांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या खास प्रसंगी तिचे आई-वडील सौ. माधुरी व श्री. जगदीश माडेकर यांच्यासह आजी-आजोबा सौ. बेबीताई देवरावजी माडेकर, तसेच मामा-मामी, काका-काकू आणि समस्त माडेकर परिवाराने ओवीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

वाढदिवसानिमित्त आकर्षक सजावट, केक कापण्याचा सोहळा आणि आनंदी वातावरणात छोटेखानी पण देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.ओवीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.माडेकर कुटुंबासाठी हा दिवस अत्यंत खास ठरत असून, कुटुंबातील एकोपा, प्रेम आणि जिव्हाळ्याचे सुंदर चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

“ओवीच्या गोड हसण्यातच कुटुंबाचा खरा आनंद दडलेला आहे,” अशा भावनिक शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर