ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथील चावडी अजीर्ण अवस्थेत

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चावडी कडे लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा नारायण गोडे यांचा आरोप

सुरेश पाचभाई मारेगाव,

बुरांडा (ख) येथील चावडी ही अजीर्ण अवस्थेत असून धोकादायक बनलेली आहे.या चावडीवरील सागाचे फाटे आणि कवेलू फुटून खाली पडलेले आहे. या चावडीमुळे कदाचित जीवितहानी होण्याची शक्यता असून याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी केला आहे.

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. येथे मागील अनेक वर्षापूर्वी चावडीचे बांधकाम करण्यात आले होते. पण आज ते पूर्णपणे अजीर्ण झाले आहे. त्याच्यावर टाकलेले सागाचे फाटे आणि कवेलू तुटून खाली पडून फुटले आहे.या ठिकाणी अनेक नेते मंडळी फक्त मतदानाच्या वेळेस मत मागायला याच ठिकाणी येतात.याच चावडीसमोर बसतात आणि मी निवडून आलो तर चावडी बांधीन असे पोकळ आश्वासन देतात.

तरीही मागील अनेक वर्षापासून चावडीची अवस्था जशीच्या तशीच आहे. बुरांडा (ख) येथे कोलाम समाज बांधवांची 60 घर आहे.विशेष म्हणजे गेल्या 45 वर्षापासून समाज बांधवांना मूर्ख बनवण्याचे काम आज पर्यंत च्या लोकप्रतिनिधींनी केले आहे,असा आरोप नारायण गोडे यांनी काल दिनांक 30 जानेवारी 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 9 वाजता च्या सुमारास घेतलेल्या मीटिंगमध्ये केला.

या वेळी सभेला बुरांडा खडकी येथील सरपंच रंगुबाई दादाराव आत्राम यांचे उपस्थितीत ही मीटिंग घेण्यात आली होती. गावातील अनेक युवक,महीला,पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर