ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ऑटो पलटून एक ठार, एक गंभीर

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव ते कोलगाव रस्त्यावरील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

कोलगाव येथून मारेगाव कडे भरधाव वेगाने येत असलेला ऑटो मारेगाव शहरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर नियंत्रण सुटून पलटी झाला. ही घटना आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोज सोमवारला दुपारी 1:45 वाजताच्या सुमारास घडली.यात एक व्यक्ती जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की..
कोलगाव वरून मारेगाव येथे येण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता आहे.या रस्त्याने वाहणांची मोठया प्रमाणात ये-जा सुरु असते. भावेश हा आपला ऑटो घेऊन कोलगाववरून मारेगाव येत होता.ऑटो मारेगाव जवळ आला आणि त्याने ऑटोवरील संतुलन गमावले.अशातच ऑटो पलटी झाला.

यात ऑटोचालक भावेश विकास केळकर वय 37 वर्ष रा.मारेगाव प्रभाग क्रमांक 13 याचा जागीच मृत्यू झाला.तर दिनेश उईके वय सुमारे 40 वर्ष रा.वडगांव ह.मु.कोलगाव असे गंभीर व्यक्तीचे नाव आहे.भावेश हा आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोज सोमवारला तो मारेगाव येथून कोलगाव येथे ऑटोने गेला होता.परतीच्या प्रवासात मारेगाव कडे येत होता पण रस्त्यातच त्याचा ऑटो पलटी झाला.

ह्या अपघातात भावेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर सदर ऑटोतील इतर एक व्यक्ती गंभीर जखमी झाले.अपघात होताच रस्त्यानी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना दिली व जखमीना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.मृतक भावेशच्या पश्चात आई,वडील,पत्नी,बहीण,जावई असा आप्तपरिवार आहे.या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर