ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भरधाव दुचाकीची उभ्या ट्रकला मागुन धडक एक गंभीर जखमी

433 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खडकी बस स्टॉप जवळील घटना

सुरेश पाचभाई मारेगांव,

बोटोणी येथील लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी सैदाबाद (कायर) येथे परत जात असतांना खडकी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला मागुन दुचाकीने जबर धडक दिली.यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवारला सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव मंगेश नत्थुजी आत्राम वय अंदाजे २२ वर्षे असे असून तो वणी तालुक्यातील सैदाबाद येथील राहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मंगेश हा नातेवाइकांच्या लग्नासाठी मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे आला होता.लग्नकार्य आटोपूण तो आपल्या गावाला सैदाबाद येथे परत जात असताना त्याच्या दुचाकीने खडकी बस स्टॉप जवळ उभ्या ट्रकला मागुन जबर धडक दिली.

या अपघातात मंगेश हा गंभीर जखमी झाला.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. व त्यांला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर