ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हटवांजरी ग्रामपंचायतच्या वतीने जवानाचा सत्कार.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत जवानाचा सत्कार सोहळा संपन्न.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळा येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देशाचे रक्षण करणारे सीमा सुरक्षा बलाचे दिलीप नानाजी आत्राम व केंद्रीय राखीव पोलीस बलाचे सुरेश आनंदराव कुडमेथे यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय सेनेमध्ये देश सेवा करताना उन वारा पाऊस सहन करत व कुटुंबाला विसरून देशासाठी आपले जीवन समर्पित करण्यास तत्पर असणाऱ्या या जवानांचा गावाच्या वतीने सत्कार केला गेला.

यावेळी दोन्ही जवानांनी आपले मनोगत व्यक्त केले.यात त्यांनी आपली असलेली पोस्टिंग,कराव्या लागणाऱ्या मेहनतीचे फळ सुद्धा कसे मिळते हे सांगीतले.यावेळी मुख्याध्यापक एम. डी.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ग्रामपंचायत हटवांजरी यांचे वतीने अंगणवाडीतील मुलांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संचालन तसेच प्रास्ताविक ग्रामसेवक कु.काकडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश आत्राम सर यांनी केले.या वेळी कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच तुकाराम कुमरे,ग्रामसेवक कु.काकडे मॅडम,पोलीस पाटील अनिरुद्ध माथनकर अंगणवाडी सेविका धोबे मॅडम,ज्येष्ठ नागरीक दादारावजी टेकाम,

शैलेश ठक,एस.एस.आत्राम सर,डब्लू.एन आत्राम सर,आशा वर्कर चंदाताई घोडाम,ग्राम पंचायत कर्मचारी मोहन मशाखेत्री तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर