Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूटमार्च.

– गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर.

– शहरात उत्सव काळात शांतता सुव्यवस्था कायम राहावी.
– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव आज दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे
आगामी सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्‍ववभूमीवर संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला असून


पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले.आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सदर रूट मार्च करिता पो.स्टे.मारेगांव येथील 1 स.पो. नि.जनार्धन खंडेराव ठाणेदार मारेगाव व तीन पोलिस उप निरीक्षक आणि 18 पोलीस अंमलदार व 20 होमगार्ड रूटमार्च करीता हजर होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!