ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

निषेध..
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याविरोधात पुरोगामी पत्रकार संघाचे निवेदन….!

160 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समाविष्ट करण्यात येईल या शासनाच्या निर्णयाविरोधात मारेगाव तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्यांचे केंद्रीय शाळेमध्ये विलीनकरण करणे असा महाराष्ट्र शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.ग्रामीण भागातील शाळा ओस पडणार आहे.ज्यांचे पोट हातावर आहे अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

खेडेभागातील गरीब विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार आहे.आणि पुन्हा जुण्यासारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते.
ही समस्या डोळ्यासमोर ठेऊन मारेगाव तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने याविरोधात मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार भास्करराव धानफुले,मोरेश्वरराव ठाकरे,भास्कर राऊत,सुमित गेडाम,सुरेश नाखले,गजानन देवाळकर,धनराज खंडरे,सुमित हेपट, गजानन आसूटकर,शरद खापणे,भैय्याजी कनाके,आनंद नक्षणे,सुरेश पाचभाई,प्रफुल ठाकरे,आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर