ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुका काँग्रेसचे महावितरण विरोधात आमरण उपोषण

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळावी या तसेच अन्य मागण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे वतीने आमरण उपोषणाला दि.23 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली.

मारेगाव तालुका हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कधीही सातत्य राहत नाही.दरवर्षी बेभरोशाच्या वातावरणामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडत जात असतो. अशातच आता शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असतांना वीज मंडळाकडून अघोषित भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे.

हे भारनियमन पूर्णतः बंद करण्यात यावे,शेतकऱ्यांना सिंचनाकरिता 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी,मारेगाव तालुक्यात 132 के व्ही चे उपकेंद्र सुरु करण्यात यावे,ग्राहकांची संख्या जास्त असल्याने नवीन वीज उपकेंद्राची मान्यता देण्यात यावी,33 केव्ही चे नवीन वीज उपकेंद्र वनोजा देवी,कुंभा,वेगाव रोहपट येथे उभारण्यात यावे,मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची वीज निर्मिती करण्यात यावी,शेतकऱ्याचे वीजबिल माफ करण्यात यावे,

नवीन कृषिचे पंपाचे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण करून जनतेला न्याय मिळावा याकरिता मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत मारेगाव तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बदकी, अंकुश माफूर, यांनी सदर उपोषण हे 23 ऑक्टोबर रोज सोमवार पासून मारेगाव येथील मार्डी चौकातील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपा समोर सुरू झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर