ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावात २२ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कोरले कुटुंबावर शोककळा

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव येथील वॉर्ड क्र. १२ परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुक्यात शोककळा पसरली आहे.

22-year-old engineering student commits suicide by hanging in Maregaon

संकेत शशिकांत कोरले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो यवतमाळ येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असताना संकेतने राहत्या घरातील छताच्या पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले.

काही वेळाने ही बाब निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.संकेतच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती मिळते.

काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर आईने मजुरी व शेतीकाम करून संकेत आणि त्याच्या बहिणीचे शिक्षण सुरू ठेवले. संकेत हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने आई व बहिणीचा मोठा आधार होता. त्याची धाकटी बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.संकेतने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मारेगाव तालुक्यात वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एका होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर