ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शासनाची रेती ठरत आहे मृगजळ

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रेती अभावी अनेक घरे अर्धवटच

अनेकांच्या घराचे काम थांबले! घरकुल धारकांचा टाहो!

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून घरकुलसह इतर बांधकामांना रेती मिळत नसल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत. तहसील,पंचायत समिती कार्यालयात गरजू रेती मिळविण्याकरिता चकरा मारत आहे.

मात्र शासनाच्या उदासीन धोरणाने घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी घोर निराशाच दिसून येत आहे.रेतीअभावी बांधकामे तर ठप्प झालीच परंतु यावर विसंबून असणारे कामगार,तसेच व्यवसाय मंदावल्याने व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे.

गरिबांना हक्काचे पक्के घर मिळवून देणारी घरकुल योजना मारेगाव तालुक्यात रेतीअभावी अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे.वाळू मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी महाखनिज या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद केल्या आहे.परंतु घरकुल बांधकामांना रेती मिळत नसल्याच्या अनेक लाभार्थ्यांची ओरड आजही कायम आहे.त्यामुळे अनेकांच्या घराची अर्धवट कामे आहेत,तर तर काहींच्या घराची छपाई व्हायचे आहे.

तूर्तास हे सर्व अर्धवट असलेले बांधकामं कामगारांना वाकुल्या दाखवत आहे. तर तालुक्यात एकमेव लिलाव झालेला कोसारा रेतीडेपो शोभेची वस्तू ठरू पाहत आहे.
मात्र,अजूनही या रेती डेपोतून तीळमात्र रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.रेतीसाठी घरकुल लाभार्थी वणवण फिरत आहे. हा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी प्रशासन कुंभकर्ण झोपत आहे.असा प्रश्न उपस्थिती होत आहे.बांधकामासाठी रेती महत्वाचा घटक असल्याने रेतीच्या दुर्मिळतेमुळे अनेक बांधकामे ठप्प झाली आहेत तर शासकीय कामात चुरीचा सर्रास वापर केला जात असल्याने शासकीय बांधकामे निकृष्ट दर्जाची निर्माण होत आहे.

रेती नाही म्हणून बांधकामे नाही यामुळे कामगाराच्या हातांना काम नाही.तालुक्यातील रेती अभावी संबंधित कामगार मजूर, व्यावसायिक,ठेकेदार,कित्येक दिवसापासून रिकामे आहे, त्यांच्या हाताला काम नाही.परिणामी त्यांच्या वर उपासमारीची वेळ असून घरकुल लाभार्थी रेती साठी क्षणोक्षणी तडफडत आहे.

तर संबंधित व्यावसायिक लोक ग्राहकांची व रेतीची आतुरतेने वाट पाहत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळवून द्यावी जेणेकरून कामगार, बिल्डिंग मटेरियल व ठेकदार यांच्या वर उपासमारीची वेळ येणार नाही, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेती ची किचकट असलेली बाब सध्या बाजूला सारून सरळ सरळ रेती लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर