ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वीज पडून महिलेचा मृत्यू

192 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील गोरज येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतामधून घरी परतत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोरज येथे घडली.ही घटना आज दि. 30 ऑगस्टला दुपारी 3.20 च्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निर्मला श्रीकृष्ण आत्राम वय 35 असे आहे.

गोरज येथील श्रीकृष्ण आत्राम हे भूमीहीन आहेत.त्यांच्याकडे शेती नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी दोन ते तीन एकर शेती ठेक्याने केलेली होती.त्यांची पत्नी शेतामध्ये निंदन करण्यासाठी गेली होती. शेतामधून घरी परतत असताना गावाजवळ असलेल्या मोहन काळे यांच्या शेताजवळ आली असता तिच्या अंगावर वीज पडली.

वीज पडली त्यावेळेस महिलेच्या समोर चंद्रभान मडावी यांची बैलबंडी तर मागे विनोद कुरेकर आणि गजानन मडावी होते.इतर कोणालाही धक्का न लागता हे वीज फक्त या महिलेच्या अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.वृत्त लीहीपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून महिलेला उत्तरिय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले होते.महिलेच्या पश्चात सासू-सासरे,पती आणि दोन मुले तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर