ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– रस्त्यात चिखलाचे गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य
– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त
– लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष

सुरेश पाचभाई संपादक:- विदर्भ एस.पी.न्युज नेटवर्क मारेगांव,

मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे.या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने व चिखलाचे साम्राज्य असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास होत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी नाही.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन हा अखेरची घटका मोजत आहे.बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता आहे.त्यापैकी जवळपास दोन किमीच्या रस्त्याचे काम झालेले आहे.अर्धा किमीच्या रस्त्याचे काम बाकी आहे.पावसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा दोन वर्षा पूर्वी १७ वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.

पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.प्रत्येक निवडणुकीच्या रणधुमाळीत विकासाचे चित्र दाखविल्या गेले.पण रस्ता मात्र राहुन गेला.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागते.

आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल, गिट्टी व खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.सन २०२१- २०२२ च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून मोठ मोठे खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर