ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

श्री.कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथील भव्य यात्रा होणार आज पासुन सुरू.

156 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आज दुपारी 1 वाजता करण्यात येणार गोपाल काला.

यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

सुरेश पाचभाई मारेगाव:तालुक्यातील नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली होती व आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला दुपारी 1 वाजता गोपाल काला करण्यात येणार आहे.आणि 28 फेब्रुवारी रोज मंगळवारला पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.

तसेच या यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले असुन या शंकरपटाचे उद्घाटन आज दि.24 फेब्रुवारी 2023 शुक्रवारला अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.तसेच भव्य यात्रेचे आयोजन पण करण्यात आले आहे.आज पासुन सुरु होणाऱ्या यात्रेचा परिसरातील भाविककान्हा आनंद घेता येणार आहे.

श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए. 392 द्वारा 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत या भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी ] असुन असंख्य जुण्या दगडी कोरीव मुर्ती त्या मंदिरात आहे.त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर आहे.गावापासुन सुमारे 1 कि.मी अंतरावर श्री तुळशी वृंदावन देवस्थान आहे.

या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन 1949 साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जाते ही मारेगाव तालुक्यातील श्री ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते. देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह, बगीच्याचे कंम्पाऊंड, पुर्ण परीसर विद्युतीकरन, प्रशस्त निवास, परीसराला संरक्षण भिंत, ईत्यादी विकास कामे झाले आहे.दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय, विश्राम गृहाचे पण काम झाले आहे.या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे आज पासुन जत्रा महोत्सव सुरू होत आहे.

दिनांक 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन 18 फेब्रुवारी रोजी घटस्थापना करण्यात आली होती व आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला दुपारी 1 वाजता गोपाल काला करण्यात येणार आहे व 28 फेब्रुवारी रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती व्यवस्थापन कमेटी व आयोजन समिती श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान, नवरगांव (धरण) ता. मारेगांव जि. यवतमाळ र.नं. ए-३९२ यांचे कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर