ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तुर पिकाचे उत्पादन घेणे अधिक फायद्याचे शेती मित्र डॉ.दिलिप अलोने

206 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- उत्पादनक्षमता मागणी आणि बाजार भाव या त्रयींचा विचार करता वर्तमान स्थितीत शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या तुर पिकाचे उत्पादन घेणे अधिक फायद्याचे ठरेल असे मत शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले.

नागपूर येथील ‘ऍग्रो व्हिजन ‘ प्रदर्शनातील तुरीचे अधिक उत्पादन या विषयावरील कार्यशाळेत तज्ञ शेतकरी म्हणून ते बोलत होते यावेळी आयोजकांच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सामान्यपणे शेतकरी तुरीकडे दुर्लक्षित पीक म्हणून बघतात मात्र मुख्य पीक म्हणून त्याकडे लक्ष दिले व योग्य व्यवस्थापन केले तर त्याचा फायदा शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी होऊ शकतो.


असा माझा शेतकरी म्हणून अनुभव आहे हे सांगताना डॉक्टर अलोने यांनी स्वत : दहा क्विंटल पासून एकरी २१ क्विंटल उत्पादनापर्यंत कशी मजल मारली याचे सविस्तर निवेदन केले तसेच बिजारोपणापासून काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन सविस्तरपणे शेतकऱ्यांसमोर मांडले जमिनीची निवड बियाणे लागवड अंतर मशागत खतांचे नियोजन पोलीस व्यवस्थापन कीड नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन केले गेल्या पंचवीस वर्षापासून ते झरी तालुक्यातील पाटण या गावी आपल्या शेतीत तुरीचे उत्पादन घेत

असून अधिक उत्पादनासाठी नवनवीन प्रयोग व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात कापूस आणि सोयाबीन या पिकाच्या तुलनेत तूर उत्पादनासाठी खर्च कमी असून अधिक उत्पादनाची शाश्वती जास्ती आहे यासाठी तूर उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे त्यांनी यावेळी दिली कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर