ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आजाराला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगाव येथील शेतशिवारातील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

वेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली. दीपक भास्कर रामटेके वय अंदाजे 25 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

दीपक हा ब-याच दिवसापासुन आजारी होता.त्याचा उपचार चंद्रपूर येथे सुरू होता.अशातच काल दिनांक 16 मे 2025 रोज शुक्रवारला सकाळी 10 वाजता  बाहेर जाऊन येतो असे सांगुन तो घरून निघून गेला.

सायंकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही.आणि रात्री उशीर व्हायला लागला तरी तो परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली.तो कुठेही दिसून न आल्याने शेवटी आज दिनांक 17 मे 2025 रोज शनिवारला सकाळी 7 वाजता गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उंबरीच्या झाडाला दीपक गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत दिसला.

दीपकने गळफास घेतल्याची वार्ता गावात पसरताचं गावातील अनेक जणांनी शेताकडे धाव घेतली.वेगाव येथील पोलीस पाटलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

व मृतदेहाचा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.दीपकच्या पश्चात आई,वडील,एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किसन शुंकूरवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर