Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

जिवंत विजेच्या तारांचा शॉक लागून 35 वर्षीय युवकाचा मृत्यू

मारेगाव येथील वार्ड नंबर 6 मधील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

घराचे बांधकामासाठी लोखंडी सलाख उचलत असतांना जिवंत विजेचा शॉक लागून एका बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 23 डिसेंबर 2023 रोज शनिवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव प्रफुल विठ्ठल तीवाळे वय 35 वर्ष रा. मांगरूळ असे आहे.

सविस्तर वृत्त असे की,
मारेगाव शहरातील वार्ड क्र.6 मध्ये एका घराचे काम सुरु होते. प्रफुल हा नेहमी प्रमाणे मारेगाव येथे मिस्त्री काम करण्यासाठी आला होता.आज सायंकाळी काम करत असताना अचानक त्याचे हातातील लोखंडी रॉडचा जिवंत 11 केव्ही विद्युत ताराला स्पर्श होऊन प्रफुलला जोरदार शॉक लागला.शॉक लागुन तो खाली कोसळला.

ही घटना जवळच्या नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली व त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पण येथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रफुल हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रफुलच्या पश्चात आई, वडील,पत्नी, एक भाऊ,एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!