ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मारेगाव येथील महिलेची दिड लाखात मध्यप्रदेशात विक्री.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नोकरीचे आमिष पडले महागात.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

मारेगाव येथील एका महिलेला कंपनीत नोकरी लावून देतो म्हणून चक्क दिड लाखात विकल्याची धक्कादायक घटना घडली असून पीडित महिलेच्या आईने रामनगर(चंद्रपूर)येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली.

मारेगाव येथे एक महिला आपल्या मुलीसोबत भाड्याने राहत होती.ती मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायची.अशातच तिची ओळख भद्रावती येथील दोघांशी तिची ओळख झाली.त्यांनी तीला नोकरीचे आमिष दाखवले.व एका कंपनीत नोकरी लावून देतो म्हणून भद्रावती येथे बोलावले आणि रात्रीच्या सुमारास तीला मध्यप्रदेश येथे नेले.तेथे तिची दिड लाखात विक्री केली.

आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच पीडितेच्या आईने 20 एप्रिल रोजी रामनगर (चंद्रपूर) येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली.पीडितेस मध्य प्रदेश जिल्हा रतलाम येथील जितु माली या इसमाला दीड लाख रुपयात विक्री केल्याची खळबळजनक घटना घडली.पीडित महिलेच्या आईने चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली.महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून संशयीतावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मारेगाव पोलीस स्टेशन कडे दि.21एप्रिल ला वर्ग करण्यात आले.

पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात 370,344,366,368,376 (2) (N), 506, 376 सह विविध कलमान्वय नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत व त्यांचे पथक या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर