ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

रंगारंग नृत्यांनी संपले मार्डी येथील स्नेहसंमेलन

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आदर्श हायस्कूल येथे करण्यात आले होते आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव,

रंगारंग नृत्याविष्कार,गीत गायन,फॅन्सी ड्रेस,खेळ तसेच विविध कार्यक्रमांनी आदर्श हायस्कूल तथा कला उच्च माध्यमिक विद्यालय मार्डी येथील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य भास्करराव धानफुले तर उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापक विलासराव ताजने होते.यावेळी मंचावर प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख,निवृत्त शिक्षक डि के चटकी,मार्डी येथील उपसरपंच शोभाताई कॉलर, मार्डी येथील पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील, दिवाकर पंडिले, प्रभारी मुख्याध्यापक रमेश ढूमणे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष जगदीश आवारी,शिक्षक अनंत शिवरकर उपस्थित होते.

दि. 23,24,25 अशा तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य, नाटक,एकांकिका, नकला, गीत गायन, फॅन्सी ड्रेसस्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या नृत्यअविष्काराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.एका पेक्षा एक सुंदर असे परफॉर्मन्स यावेळी विद्यार्थ्यांकडून केल्या गेले.

पहिल्या दिवशी नृत्य, एकांकिका, नक्कल असे कार्यक्रम घेण्यात आले.या उदघाटनीय कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश ढूमणे यांनी तर आभार नितु मेश्राम यांनी मानले.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर शेवटच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाचे संचालन सुरेश नाखले यांनी, प्रास्ताविक अनंत शिवरकर यांनी तर आभार जगन भोंगळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ येटी, ज्ञानेश्वर दातारकर अंकुश कांबळे,भास्कर जिवतोडे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर