ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साई मित्र परिवार मारेगाव तर्फे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रुग्णवाहिकेचा होणार मारेगावकरांसह तालुक्यातील जनतेला मोठा फायदा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव : येथील साई मित्र परिवारातर्फे स्थानिक मार्डी चौक येथे आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सायंकाळी ७ वाजता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून मारेगावकरान सह तालुक्यातील जनतेसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.


आज अयोध्येतील – नवनिर्मित प्रभु श्रीराम मंदिरात रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील गरजू रुग्णांच्या सेवेत सर्व सुविधापूर्ण २४ तास सेवेत राहणारी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा साई मित्र परिवार सदस्यांच्या उपस्थितीत मार्डी चौक येथे आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या सेवेत एक रुग्णवाहिका असावी यासाठी साई मित्र परिवाराच्या सदस्यांनी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना वर्गणी न मागता स्वतः च्या परीने होईल ते पैसे नवीन रुग्णवाहिकेसाठी देवून तालुयातील नागरिकांना वेळेवर जिल्हा रुग्णालयात पोहोचून आपले अमूल्य जीव वाचविता यावे यासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाकडून उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध होऊ शकत नसल्याने अपघातग्रस्त, गंभीर आजारी, श्वान, सर्पदंश, वन्य प्राण्यांचा हल्ला इत्यादी झालेले रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने कुठल्याही वैद्यकीय सोयी नसलेल्या खाजगी वाहनांद्वारे जीव धोक्यात घालून जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावे लागते.

ज्यामध्ये बरीच जीवितहानी सुद्धा तालुक्यातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून सोसावी लागलेली आहे. उपरोक्त सर्व बाबींचा सारासार विचार करून साई मित्र परिवाराच्या सदस्यांच्या प्रयत्नाने नागरिकांचा जिव वाचविणार आहे.या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर