ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगावचे पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली

127 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव :- पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जनार्धन
खंडेराव यांची बदली वाशिम येथे झाली असून,त्यांच्या रिक्त जागेवर नविन ठाणेदार कोण येणार याकडे आता तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.

अमरावती पोलीस महानिरीक्ष कार्यालय अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच करण्यात आली आहे. मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची दी.२४ फेब्रुवारीला रात्री यांच्या बदलीचे आदेश निघाले असुन

आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मा.केंद्रीय निवडणुक आयोग,मा.मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा.पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणेकामी दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.


सदर बैठकित महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी खालील सहा.पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे.

अखेर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची २४ फेब्रुवारी २०२४ रोजी बदलीचे आदेश धडकले आणि त्यांची वाशिम येथे बदली झाल्याच्या आदेश जिल्हा पोलीस यवतमाळ यांना धडकला.संबंधीत घटक प्रमुखांनी या बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तत्काळ बजावुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. बदली झालेल्या पोलीस अधिका-यांना कार्यमुक्त करतांना पर्यायी/बदलीवर येणा- या पोलीस अधिका-यांची वाट पाहु नये. तसेच भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटोकोरणे पालन करावे,

कोणत्याही घटकात निवडणुकिची प्रक्रीया किंवा त्या अनुषंगाने आचार संहिता सुरु असल्यास घटक प्रमुखांनी संबंधीत निवडणूक अधिका-यांशी संपर्क साधून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवुन संबंधीत अधिका-यास कार्यमुक्त करावे व तसा अनुपालन अहवाल सादर करावा,नमुद बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता रुग्णनिवेदन करतील किंवा गैरहजर रहातील ते पोलीस अधिकारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याबाबतची समज त्यांना दयावी आणि भारतीय निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्याजाईल, कोणत्याही प्रकारचे उल्लंघण होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आदेश पत्रात नमूद आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर