ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ठरावाला बगल देऊन बाहेरील व्यक्तीची नेमणूक

951 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत होतोय घोळ

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत खापरी येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाकरिता लागणारे मनुष्यबळ हे खापरी येथीलच किंवा सगनापूर पेसा गट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतर्गतच घेण्यात यावे असे ठरलेले असतानाही  बाहेरील मजूर घेत असल्याचा प्रकार मौजा खापरी येथील सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये सुरु असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.

मारेगाव तालुक्यातील मौजा खापरी येथे मुख्यमंत्री सौर प्रकल्प सुरू आहे.या प्रकल्पा अंतर्गत येथे कुशल किंवा अकुशल कामगार घेण्यात येणार ते सगनापूर पेसा गट ग्रामपंचायत अंतर्गतच घेण्यात यावे अशा प्रकारचा ठराव जागा उपलब्ध करून देत असताना घेण्यात आला.याच अटीवर ग्रामपंचायतने हा ठराव वीज नियामक मंडळाला दिला.या प्रकल्पाला लागणारे मजूर किंवा कामगार हे खापरी या गावातीलच घेण्यात यावे अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख या ठरावामध्ये आहे.

ज्या अटी आणि शर्तीवर ग्रामपंचायतने ही जागा सौर प्रकल्पासाठी दिली त्या सौर प्रकल्पाच्या कामांमध्ये आता बाहेरील मजुरांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे गावात प्रकल्प असताना गावातील नागरिकांना या प्रकल्पामध्ये काम मिळत नसल्याने गावात बेरोजगारीचे वातावरण पसरलेले आहे.त्यामुळे या सौर प्रकल्पांमध्ये असलेले बाहेरील मजूर कमी करून खापरी येथीलच मजूर घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

सगणापूर पेसा गट ग्रामपंचायत अंतर्गत खापरी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम सुरू आहे.सदर काम ठरावाला बगल देऊन बाहेरील व्यक्तींना कामावर घेऊन जर काम केले जात असेल तर लवकरच ग्रामसभा घेतली जाईल आणि सदर ठराव रद्द करण्याबाबत संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
श्री.दादाराव कपलुजी टेकाम,सरपंच गट – ग्रामपंचायत कार्यालय सगणापूर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर