ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

नवरगाव धरण परिसरातील मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ती आत्महत्या नसून घातपात असल्याचा वडिलांचा आरोप

युवकाच्या पालकाची मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस पी न्यूज नेटवर्क मारेगाव,

नवरगाव धरण परिसरात आढळून आलेल्या मृत्यू प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली असून “”तो “”मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करीत तशा प्रकारची तक्रार मृत युवकाच्या वडिलाने मारेगाव ठाण्यात केली.त्यामुळे पोलीस प्रशासन आता कशा प्रकारे पावले उचलणार याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणा जवळ दि.27 मार्च रोज बुधवारला वणी तालुक्यातील रासा येथील प्रज्योत भीमराव मुन याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी विषारी मोनोसिल कीटकनाशकाची बॉटल आढळून आली होती.त्यामुळे ती वरकरणी आत्महत्या असावी असे वाटत होते.

रासा येथे राहणारा हा युवक नवरगाव धरणाजवळ जाऊन आत्महत्या का करेल.तो त्यासाठी या झुडुप भागामध्ये येऊन आत्महत्या करेल हेच संशयास्पद वाटत होते.अशातच दि.1 एप्रिलला मृतक प्रज्योत याच्या वडिलाने माझ्या मुलाची आत्महत्या नसून कुणीतरी घातपात केल्याचा आरोप करीत मारेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.यामध्ये मुलाच्या मोबाईल नंबरवर झालेल्या संभाषणाची चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावावा अशा प्रकारची अर्जाद्वारे मागणीही केलेली आहे. आता हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे.

पोलिसांनी केला तपास सुरू आहे

मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाची चौकशी दिली आहे.आणि या प्रकरणीतील प्रत्येक बिंदूची बारीक तपासणी करून,प्रत्येक गोष्टीवर तपास,तांत्रिक दृष्ट्या तपास,स्पॉट निरीक्षण बारकाईने आणि योग्य रित्या केला जाईल आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न करेल.प्रज्योतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. त्याचा तांत्रिकदृष्ट्या तपासही केला जात आहे.
“”उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत””
ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर