ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅक  तर्फे B++ दर्जा प्राप्त

186 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

झरी जामनी – पैनगंगा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित राजीव विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालय, झरी जामनी येथे  नुकतीच बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेच्या  समन्वयक समितीने   दिनांक ०९ व १० सप्टेंबर २०२४ रोजी भेट दिली असता त्यांनी केलेल्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास बी. डबल प्लस (B++) दर्जा प्राप्त झाला आहे.

नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष मिझोराम येथील  मिझोरम केंद्रीय विद्यापीठ,एस्वल चे  कुलगुरू डॉ.दिबांकर चंद्रा डेका,समन्वयक  बिहार येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठ दरभंगाचे डीन डॉ. विभूती भूषणलाल  दास ,व सदस्य डॉ.मोहम्मद अझहर बेग ,प्राचार्य वाय.आर.के.शासकीय पदवी महाविद्यालय   नेल्लोर,आंध्रप्रदेश

या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयातील महाविद्यालयात असलेल्या सुविधा व विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी विज्ञान  विभागातील प्रयोगशाळा,वाणिज्य विभाग,संगणक कक्ष,ग्रंथालय, क्रीडा विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग , बोटानिकल गार्डन , नवोक्रम नवसंशोधन विभाग अशा विविध विभागांना  भेटी देऊन महाविद्यालयाची तपासणी केल्यानंतर महाविद्यालयास २.८७ हे गुणांकन प्राप्त झाले असून बी. डबल प्लस(B++) दर्जा मिळाला आहे.

या यशाबद्दल मा आ.वामनराव कासावार संस्थेचे अध्यक्ष  प्रवीण कासावार उपाध्यक्ष राजीव कासावार सचिव श्रीलता कासावार ,सुर्यतेज कासावार व इतर संचालक यांनी महाविद्यालयातील प्राचार्य  डॉ. अनिल कोरपेनवार व अंतर्गत गुणवत्ता समन्वयक प्रा.संतोष पोलचेट्टीवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,प्राध्यापक शिक्केत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटना,आजी  विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन समन्वय साधत महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दिले. 

या यशाबद्दल प्राचार्य डॉ.अनिल कोरपेनवार  यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता  समन्वयक प्रा.संतोष पोलचेट्टीवार विविध समित्याचे समन्वयक ,सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर