ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

विज्ञान शाखेचा गुजरात अभ्यास दौरा ठरला संस्मरणीय; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यातील शैक्षणिक अभ्यास दौरा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. दिनांक ९ मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या दौर्‍यात सुमारे ६० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एन. घरडे यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दौऱ्याचे नियोजन सुयोग्यरीत्या पार पडले. दौर्‍याचे समन्वयक म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनोद चव्हाण व गणित विभाग प्रमुख प्रा. अक्षय जेनेकर यांनी जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली.

या अभ्यास दौर्‍यादरम्यान विद्यार्थ्यांनी द्वारका, सोमनाथ मंदिर, अहमदाबाद, सायन्स सिटी, साबरमती आश्रम, रण ऑफ कच्छ, वे ऑफ हेवन, भुज, वडोदरा तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक स्थळांना भेट दिली. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध परंपरेसोबत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचीही सखोल ओळख झाली.

अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, तर साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती मिळाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांनी जाणून घेतला.

रण ऑफ कच्छचे निसर्गसौंदर्य, भुज परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्ये तसेच द्वारका व सोमनाथ येथील धार्मिक वारसा विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. या दौर्‍यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.

दौर्‍यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करत महाविद्यालय प्रशासन व प्राध्यापकांचे आभार मानले. लवकरच महाविद्यालयात अनुभव सादरीकरणाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
एकूणच, हा शैक्षणिक अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरला असून महाविद्यालयाच्या उपक्रमांमध्ये एक उल्लेखनीय ठसा उमटवणारा ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर