ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

कंत्राटी शिक्षण सेवकांचे मानधन त्वरित जमा करा

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कंत्राटी शिक्षण सेवकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सुरेश पाचभाई मारेगाव

रखडलेले कंत्राटी शिक्षण सेवकांचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे यासाठी कंत्राटी शिक्षण सेवकांनी दि. 16 जुलैला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सध्या सगळीकडेच शिक्षकांची संख्या कमी होत आहे.विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी,त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सगळीकडे कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर शिक्षकांची भरती केली.मारेगाव तालुक्यामध्ये 58 कंत्राटी शिक्षण सेवकांची नेमणूक केल्या गेली.या कंत्राटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि जी.प.शाळेमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.अल्प मानधन तत्वावर काम करूनही या कंत्राटी शिक्षण सेवकांना नियमित वेतन दिले गेले नाही.

सुरवातीला 5 हजार तर नंतर 7 हजार 500 याप्रमाणे या शिक्षण सेवकांना मानधन दिल्या गेले.परंतु मार्च 2024 व एप्रिल 2024 या दोन महिन्यांचे वेतन अजूनही यांना मिळालेले नाही. याविषयी या शिक्षण सेवकांनी अनेकदा कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता तुमचे पैसे चार दिवसात जमा होईल असे उत्तर अनेकदा ऐकायला मिळाले.त्यामुळे आमचे थकीत असलेले मानधन त्वरित मिळावे असे निवेदन कंत्राटी शिक्षण सेवकांनी गटविकास अधिकारी यांना दिले.यावेळी अंकुश आत्राम,राजू ढोरे,स्वप्नील देऊळकर,मानसी नित,वैष्णवी ढवस,पूनम ढवस, निलेश मंगाम उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर