ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पतीचा मृत्यू नंतर काही महिन्यांत पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव :- तालुक्यातील मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे वय सुमारे 24 वर्षे असे वडिलांच्या घरी आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे नाव असुन मार्डी येथील जीवन नारायण वैद्य यांच्या मुलीचे लग्न 2 वर्षांपूर्वी वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर गावांतील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता.

त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. यांचा सुखाने संसार सुरु असतांना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलीच्या संगोपणाची जबाबदारी रोशनीवर आली पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा अश्या विवंचनेत होती.

दिनांक 7 जुन रोज मंगळवारला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मार्डी येथील वडिलांच्या घरी कोणीही नसताना घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने चिमुकलीसह गळफास घेतला छोट्या मुलींचे नशीब चांगले म्हणून चिमुकलीचे प्राण वाचले पण आईला जीव गमवावा लागला. सुमारे 9 महिन्याच्या चिमुकलीचे वणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वडिला नंतर काही महिन्यात आईचाही मृत्यू झाल्याने 9 महिन्याची चिमुकली आता पोरकी झाली आहे.या घटनेने मार्डी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.व या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर