ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नगारा येथील जि. प. शाळेला शिक्षक द्या; शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील इंदिराग्राम (नगारा) येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. ५० विद्यार्थ्यांचा पट असलेल्या या शाळेत यापूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र अलीकडे एक शिक्षक कमी करण्यात आल्याने सध्या केवळ एकाच शिक्षकावर शाळेचा संपूर्ण कारभार सुरू आहे.

एका शिक्षकावर मुख्याध्यापक पदाचा चार्ज, बी.एल.ओ.चे काम आणि ५० विद्यार्थ्यांचे अध्यापन करणे अशक्य असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब पालकांकडूनही उपस्थित करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील शेतमजूर व कष्टकरी पालक दिवसभर शेतात काम करतात आणि आपल्या मुलांना शिक्षकांच्या भरवशावर शाळेत पाठवतात. मात्र एकाच शिक्षकावर सर्व जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष दिले जाईल का, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

“आमच्या गरीबांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क नाही का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती मारेगावचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. नगारा शाळेत तातडीने अतिरिक्त शिक्षक नेमण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नेहारे यांनी सांगितले की, शिक्षकसंख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन नगारा शाळेत पुन्हा एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी इंदिराग्राम (नगारा) येथील नागरिकांनी पंचायत समिती येथे निवेदन दिले असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे परिसरातील पालकांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर