ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात पावसाचे थैमान.

180 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,

मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की.

तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सततच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे.तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे. तर आज दिनांक 21 जुलै 2024 रोज रविवारला पहाटे पासुन कोसारा पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे.

प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. दोन दिवसा पासून सुरु असलेल्या सततधार पावसाने संम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घराबाहेर कोनालाही पडण्याची संधी मिळाली नाही. शेतकऱ्यांची शेती कामे खोळबली आहे. शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजूरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले.पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी ओसांडून वाहत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी तुडुंब भरलेले आहेत.

तालुक्यातून वाहणारी वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोसारा पूल पाण्याखाली आला असून या पुलावरून सुमारे 2 ते 3 फूट एवढे पाणी वाहत आहेत. पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मारेगाव तालुक्यातील अनेक गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील मार्डा येथील डॅमवरूनही पाणी ओसंडून वाहत आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दोन दिवसा पासुन सतत सुरु असलेल्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

चिंचमडळ /दापोरा येथील शेतकरी यांचे पीक पाण्याखाली असल्याने हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली आहे. तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत असून नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तालुक्यातील महसुल प्रशासन व पोलिस प्रशासन पुर परस्थिती असलेल्या ठिकाणी भेट देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर